हे विप्रवर देवी चे हे कवच अत्यंत गुणकारी व सगळ्या बाधा पासुन रक्षा करनोर आहे हे महामुनि याला आवश्य ऐकाला हवे, श्रवण करावे।
 

मन्त्रार्थ
1. प्रथम माता देवी शैलपुत्री आहे, द्वितीय देवी ब्रह्मचारिणी आहे तृतीया देवी चे रूप चंद्रघण्टा आहे। कुष्माण्डा चौथेस्वरूप आहे। पाचव स्कन्धमाता आहे छटवी(सहावी) कात्यायनी आहे, सातवीं देवी कालरात्री आहे, आणि महागौरी आठवीं आहे। नवमीं सिद्धी दात्री आहे। या प्रकारे देवीचे नव(नऊ) स्वरूप सांगीतल आहे
2. देवी चे हे नाव महात्मा ब्रह्मा द्वारा वर्णित आहे। जे विषम परिस्थिति मध्ये दुर्गम स्थळावर किंवा भितीमध्ये (भय) किवां अत्यन्त दुःखानी त्रस्त झाल्यानंतर देवीच्या शरणागत येतात। त्यांचे रणामध्ये किंवा संकटामध्ये किंचित ही अहित होत नाही। त्यांना अपयश मीळत नाही आणि कसल्याही प्रकारे शोक, दुःख, भय, किंचित ही प्राप्त होत नाही।।
देवी चे अन्य नांव
जयन्ती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवाधात्री, स्वाहा, आणि स्वाधा या अकरा नावांनी देवी प्रसिद्ध आहे। तीला नमस्कार आहे।